गुरूवारी होणार 'भीमा'च्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vishwaraj Mahadik and Satish Jagtap

संपूर्ण राज्यात चर्चील्या गेलेल्या टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.

Bhima Sugar Factory : गुरूवारी होणार 'भीमा'च्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड"

मोहोळ - संपूर्ण राज्यात चर्चील्या गेलेल्या टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. गुरुवार ता २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. अध्यक्षपदी नूतन संचालक विश्वराज महाडिक यांची तर उपाध्यक्षपदी संचालक सतीश जगताप यांची फेर निवड होण्याची शक्यता आहे. या माध्यमातुन कारखान्याची सुत्रे महाडिक यांच्या तिसऱ्या पिढीकडे जाणार आहेत.

जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी सर्व नूतन संचालकाची बैठक कारखाना कार्यस्थळावर आयोजित केली आहे. तत्पुर्वी खा धनंजय महाडिक हे सर्व संचालक मंडळ व प्रमुख कार्यकर्त्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर निवडी होणार आहेत. सर्व संचालक व कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करूनच अध्यक्ष उपाध्यक्ष ठरवण्यात येणार असल्याचे खा महाडिक यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. या निवडणुकीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते, तर खा. महाडिक यांच्यासह दोन माजी आमदार, मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रचारातील विविध मुद्याने ही निवडणूक गाजली.

नूतन संचालक विश्वराज महाडिक यांच्या 'अमेरिका ते शेतकऱ्यांचा बांध' या प्रवासामुळे निवडणुक मोठी चर्चेत आली. या निवडणुकी पूर्वी पहिल्या विचार विनिमय सभेत अनेकांनी युवकांना संधी द्या अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत या संचालक मंडळात खा. महाडिक यांनी ६ जणांना नव्याने संधी दिली आहे, तर ९ जण जुने आहेत

उपाध्यक्ष जगताप यांनी गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत कारखान्यावर आणलेल्या व आलेल्या संकटाचा सामना खा. महाडिक यांच्या मार्गदर्शनाने व संचालक मंडळाच्या सहकार्याने केला. नूतन अध्यक्ष विश्वराज महाडिक हे नवीन आहेत. त्यामुळे संचालक मंडळात जसा नव्या जुन्यांचा मेळ घातला आहे, तसाच अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यातही मेळ घालून कारखाना प्रगती पथावर नेण्यासाठी खा महाडिक प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :moholbhima sugar factory