esakal | बिगब्रेकिंग... इराक, इराणमध्ये अडकले अकलूजमधील 44 भाविक
sakal

बोलून बातमी शोधा

Bigbreaking 44 devotees from Akluj trapped in Iraq Iran

"डब्ल्यूएचओ'कडून नियंत्रणाचे संकेत 
जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्व देशांना कोरोना व्हायरस रोखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

बिगब्रेकिंग... इराक, इराणमध्ये अडकले अकलूजमधील 44 भाविक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : तीर्थयात्रेसाठी इराक आणि इराणमध्ये गेलेले महाराष्ट्रातील 600 भाविक इराणमधील तेहेरानमध्ये अडकले आहेत. यात अकलूजच्या 44 भाविकांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे या देशांनी सीमा बंद केल्याने त्यांना अडकून पडावे लागलेय. आम्हाला तातडीने मायदेशी आणा, असे आवाहन या भाविकांनी सरकारला केलंय. "कोरोना'ने आता अनेक देशांत हातपाय पसरले आहेत. त्याचा फटका जगभरातल्या प्रवाशांना बसतोय. कोल्हापूरमधल्या साद टूर्स कंपनीने ही सहल आयोजित केली होती. 
31 जानेवारीला हे भाविक तेहेरानमध्ये पोचले होते. तेहेरानजवळच्या कुम या शहरात हे सर्व भाविक सध्या अडकून पडले आहेत. आम्हाला तातडीने या शहरातून बाहेर काढा, अशी विनंती त्यांनी केलीय. शिया पंथियांसाठी पवित्र मानल्या गेलेल्या इराक आणि इराणमधल्या धर्मस्थळांच्या दर्शनासाठी हे भाविक तिथे गेले होते. त्याच दरम्यान "कोरोना'चे संकट निर्माण झाल्याने त्या देशांनी आपल्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. 
आतापर्यंत जगातील तब्बल 48 देशांतील नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यापैकी 40 हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केले आहे. आतापर्यंत "कोरोना'मुळे दोन हजार 802 जण मरण पावले आहेत. तर 82 हजार 059 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. चीननंतर दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये "कोरोना'चा संसर्ग वाढला आहे.