

A memorandum submitted to the Maharashtra Chief Minister also seeks confidentiality for citizens reporting illegal gambling activities.
Sakal
मंगळवेढा : तालुक्यातील बोराळे येथील दारू विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप पंचायत समिती सदस्यांनी केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवेढा शहरातील जुगार व मटका हे अवैध धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी भाजप शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्याकडून गृहमंत्रीपदाची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्याकडे ही मागणी केल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली