भाजप नगरसेवक कामाठी पसार! पोलिसांकडून वरदहस्ताची चौकशी

1Crime_6_98 - Copy.jpg
1Crime_6_98 - Copy.jpg

सोलापूर : भाजपचे नगरसेवक सुनिल कामाठी हा आकाश कामाठी, इस्माईल मुच्छाले, स्टिफन स्वामी, शंकर धोत्रे, सुरज कांबळे यांच्या मदतीने त्याठिकाणी जुगार अड्डा चालवित होता. अशोक चौक परिसरातील एका इमारतीतील दरमहा अडीच कोटींचा अवैध व्यवसाय कोणाच्या वरदहस्ताने सुरु होता, याचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तत्पूर्वी, आज पोलिसांनी आकाश कामाठी, अफसर सय्यद, अख्तर दर्जी या तिघांना अटक केली आहे.

कोंचीकोरवी गल्लीतील राजभुलक्ष्मी इमारतीच्या कंपाउंटवर पत्रे मारुन उंची वाढविली होती. त्याला हिरवे कापड लावून आतील सर्व हालचाली लपविण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता कोरोनामुळे त्याठिकाणी अधिक लोक जमा झाल्याने खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली. मात्र, वर्षानुवर्षे त्या इमारतीत सुरु असलेला अवैध व्यवसाय स्थानिक पोलिसांना का समजला नाही, या अवैध प्रकाराला आणखी काही पोलिस अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहन दिले का, त्यांच्यावर कोणाचा राजकीय दबाव होता का, या अनुषंगाने चौकशी सुरु आहे. दरम्यान, सोमवारी (ता. 24) त्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकण्यापूर्वीच काहीजण इमातीवरुन उड्या मारुन पळून गेले. तर परवेझ इनामदार उडी मारताना खाली पडला आणि जखमी आवस्थेत त्याला सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. मंगळवारी (ता. 25) त्याचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी घटनेची सीआयडी चौकशी करा, अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

सहा जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी
मंगळवारी (ता. 25) सर्व संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पोलीस शिपाई स्टीफन स्वामी, रियाज काझी, प्रकाश हित्तनळ्ळी, भीमाशंकर करजगी, संदेश चीतली, रियाज मनियार यांना एक दिवसाची (बुधवारपर्यंत) पोलिस कोठडी ठोठावली. या प्रकरणात पोलिस शिपाई स्वामीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. विनोद सूर्यवंशी, ऍड. राजकुमार मात्रे, ऍड. श्रीकांत पवार यांनी काम पाहिले. तर सरकारतर्फे ऍड. करवते यांनी काम पाहिले.


'या' 22 संशयितांवर गुन्हा
शिवराम फुटाणे, रियाज काझी, केदार बोरामणी, श्रीरंग भोसले, प्रकाश हित्तनळ्ळी, महेश स्वामी, राजकुमार उडचाण, अंबादास कौतम, जाकीर शेख, मोहन बोगा, भिमाशंकर सोलापुरे, भिमाशंकर करजगी, संदेश चितली, सिध्दाराम इंगळे, रियाज मनियार, प्रमोद देवकते, सलीम फनीबंद, फैय्याज शेख, संदिप कांबळे, सुनिल अष्टगी, आनंदप्पा बामदी, यादगिरी भंडारी यांच्या माध्यमातून एजंटांकडून मोबाइल तथा व्हॉट्‌सऍपद्वारे मटका घेतला जात होता. त्याची वेब व्हॉट्‌सऍपद्वारे लॅपटॉपवरुन प्रिंट काढली जात होती. या सर्व संशयितांविरुध्द जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com