मंगळवेढा - उजनी धरण 50 टक्केहून अधिक भरले असल्याने धरणातून उजनी उजव्या व डावा कालव्यासह नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेऊन समक्ष मागणी करत याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात पाऊस झाला नाही. हवामान खात्याच्या सद्य अंदाजानुसार दुसऱ्या टप्प्यात देखील पाऊस दाखवत नाही. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून जिल्हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे..विशेषता ऊस उत्पादक शेतकरी सर्वात जास्त आहे औद्योगिक व इतर कोणत्याही बाबींपासून आर्थिक उलाढाल होत नाही. जिल्ह्यात त्यांसोबत फळबागा देखील जास्त प्रमाणात आहेत. परंतु पाण्याअभावी ऊस, फळबागा व इतर खरीप हंगामातील पिके पूर्ण जळून जात आहेत..भविष्यात दुष्काळ सदृश परिस्थिती ओढवली तर जनावरांना चारा म्हणून कोणतंच पीक हाती लागणार नसल्याने सद्य स्थितीस उजनी धरण हे 51% भरल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाण्याअभावी जिकरीची झाल्याने उजनी धरणातून भीमा नदी पात्रात व उजवा डावा कालव्यात पाणी सोडावे तसेच आपल्याकडे पाऊस पडणार नाही, अशी माहिती उपलब्ध असल्याने भीमा नदी पात्रातील बंधाऱ्याची दारे काढलेली आहेत. ती बंद केली तर वीर धरणातून येणारे पाणी अडवता येईल. याचाही लाभ जिल्ह्यातील विविध योजना करिता घेता येईल. असे निवेदनात नमूद केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.