
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ४२९ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दाखल केलेल्या अर्जामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख यांची माणसं कोण आणि माजी आमदार दिलीप माने यांची माणसं कोण? याचा कसून शोध घेतला जात आहे. दोन पॅनेलला सर्वच्या सर्व जागांवर सक्षम उमेदवार मिळतील, अशी स्थिती प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. उमेदवारीचा अंतिम निर्णय भाजपची राज्य पातळीवरील श्रेष्ठीच घेण्याची शक्यता आहे.