Solapur : फाटाफुटीनंतरही भाजप 'प्लस'मध्ये; पाच उमेदवार विजयी; नेतृत्व भाजपचे, फायदा काँग्रेसचा?, नेमकं काय घडलं..
निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने यांच्या पॅनेलने १३ जागा जिंकून सत्ता मिळवली असली तरी ग्रामपंचायत गटात आमदार सुभाष देशमुख यांची ताकद दिसून आली.
सोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पहिल्यांदाच पाच उमेदवार निवडून आले आहेत. पक्षाच्या आमदारांत फाटाफूट होऊनही भाजप ''प्लस''मध्ये राहिली आहे. तर भाजप आमदारांच्या मदतीने काँग्रेसने वर्चस्व राखले आहे.