Manglwedha Election : आक्रमक आणि खोटी भाषने करणाऱ्या विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका : आमदार समाधान आवताडे

Manglwedha election campaign BJP : मंगळवेढ्यात मिनी मंत्रालय निवडणूक प्रचाराची सुरुवात करताना आमदार समाधान आवताडे यांनी विरोधकांच्या आक्रमक व खोट्या भाषणांवर जोरदार टीका केली.
Manglwedha election campaign BJP

Manglwedha election campaign BJP

sakal

Updated on

सलगर बुद्रुक (जिल्हा सोलापूर) : विरोधक येतील, खोटी आणि आक्रमक भाषणे करतील. पण त्यांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या मागे मंगळवेढ्यातील जनतेने उभे राहावे, असे आवाहन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी केले.मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठी माचनूर येथे वसलेल्या तीर्थक्षेत्र श्री सिद्धेश्वर मंदिरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ भारतीय जनता पार्टी कडून केला गेला.त्यावेळेस आमदार अवताडे हे बोलत होते. मंगळवेढा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून भारतीय जनता पार्टी मंगळवेढ्याचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी प्रथम दर्शनी तरी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com