

Solapur Municipal Corporation election result
- प्रमिला चोरगी
महापालिकेत इतिहास घडवत प्रथमच भाजपने १०२ पैकी ८७ उमेदवार निवडणूक आणत एकहातीच सत्ता काबीज केली. सोलापुरात भाजपची लाट नव्हे तर ‘सुनामी’ आल्याचे चित्र आजच्या निकालावरून दिसून आले. यावेळी पाच माजी महापौर, चार माजी उपमहापौरांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आठ जागा मिळवत ‘एमआयएम’ दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.