
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत नेत्यांसाठी जिवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकटे पडू देणार नाही, त्यांची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वाढावी, यासाठी आम्ही कार्यकर्त्यांमागे खंबीर उभे असल्याची भूमिका आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुखांनी बुधवारी (ता. १६) घेतली. पक्षाचा कोणताही आदेश नसताना नेत्यांनी आपल्या सोयीने आघाडी केल्याचे सांगत दोन्ही देशमुखांनी बाजार समितीसाठी एकत्रित प्रचार करण्याचा निर्णय घेतला.