Madha News : माढयाचे गटविकास अधिकारी बनले शिक्षक; गटविकास अधिकाऱ्यांची शिक्षकाची भूमिका, ग्रामीण शिक्षणाला नवा उत्साह

Rural Education and Administrative Sensitivity : माढ्याचे गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी धानोरे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देत थेट शिक्षकाची भूमिका साकारली. विद्यार्थ्यांना गणित आणि भाषेचे धडे गिरवताना पाहून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रशासकीय संवेदनशीलता आणि ग्रामीण शिक्षणाप्रती त्यांची ही कृती प्रेरणादायी ठरली आहे.
Rural Education and Administrative Sensitivity

Rural Education and Administrative Sensitivity

sakal

Updated on

माढा : माढा तालुका पंचायत समिती कुर्डूवाडीचे गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी धानोरे (ता. माढा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला दिलेली भेट देऊन विद्यार्थ्यांना गणित, भाषा विषयाच्या बेरीज, वजाबाकी, बाराखडी, वाचन यांसारख्या गोष्टी शिकवल्या. गटविकास अधिकारीच शिक्षकांच्या भूमिकेत पाहिल्याने तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात व धानोरे गावातील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com