
सोलापूर : वाखरी ते वेळापूर रोडवरील थोरात पेट्रोल पंपासमोर २६ जानेवारीला रात्री साडेदहा वाजता भरधाव बोलेरो जीपची (एमएच ४५, एएल ५४८९) उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडक बसली. सागर धनाजी कांबळे (वय २७, रा. लऊळ, ता. माढा) याने भरधाव वेगाने जीप चालवली व त्या अपघातात सौदागर नरहरी लोंढे (वय ५०, रा. मोडनिंब, ता. माढा) हे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला आहे.