पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी... 

To boost the immune power of the police
To boost the immune power of the police
Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर) : राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा प्रादुर्भाव रोखताना पोलिसांची दमछाक होत आहे. अशातच आता पोलिस अधिकारी व कर्मचारीही कोरोनाला बळी पडू लागले आहेत. कोरोनाशी लढताना पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचे प्रयत्न होत असतानाच, पंढरपुरातील पोलिसांना आयुर्वेदिक काढा दिला जात आहे. अशा प्रकारचा राज्यातील पहिला प्रयोग पंढरपूर पोलिसांसाठी सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली. 
कोरोनाशी लढताना राज्यात आतापर्यंत आठ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मृत्यूने गाठले आहे. तर सोलापूर जिल्ह्यातही जवळपास 15 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून पंढरपुरातील सुमारे 500 पोलिसांना औषधी वनस्पतींपासून तयार केलेला आयुर्वेदिक काढा दिला जात आहे. येथील आबासाहेब रणदिवे यांनी नऊ प्रकारच्या विविध औषधी वनस्पतींपासून हा काढा तयार केला आहे. 
यामध्ये गुळवेल, अश्‍वगंधा, पिंपळी, कंटकरी, तुरटी, तुळशी, ज्येष्ठ मध, सुंठ, हळद आदी नऊ औषधी वनस्पतींपासून आयुर्वेदिक काढा तयार केला आहे. हा काढा प्रत्येक पोलिसाला दररोज 50 मिलीप्रमाणे एक महिना दिला जाणार आहे. आयुर्वेदिक काढ्यामुळे पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून ते कोरोनाशी मुकाबला करतील, अशी या मागची भूमिका आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ashadhi Wari 2026: Warkaris Stay Firm on Alandi Route Despite Heavy Rain Warning
zp schools
Dal chaval Recipe
RTO Office meeting
Marathi News Esakal
www.esakal.com