शहराला "ब्रेक द चेन'ची मदत मिळालीच नाही !

सोलापूर शहरात ब्रेक द चेनची मदत मिळाली नाही
Workers
WorkersEsakal

बहुतेक लाभार्थींना अर्ज कसा व कुठे करायचा याची माहितीच नाही. काही लाभार्थींच्या बॅंक खात्यांची माहिती चुकली आहे.

सोलापूर : कोरोनाच्या Covid-19) दुसऱ्या लाटेत कडक निर्बंध लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी "ब्रेक द चेन' (Break the chain) अंतर्गत रिक्षाचालक, फेरीवाले आणि नोंदणीकृत घरेलू व बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजारांची मदत घोषित केली. ही रक्‍कम शासनाकडून संबंधित खात्याकडे वर्ग करण्यात आली आहे. आता कडक लॉकडाउन (Lockdown) जाहीर करून दीड महिन्याचा काळ लोटला, तरीही शहरातील 40 हजार लाभार्थींना मदत मिळालीच नाही. (Break the chain scheme did not help in the city of Solapur)

Workers
130 कोटींच्या घोळात थांबली 450 कोटींची सोलापूर-उजनी दुहेरी पाइपलाइन !

शहरात नोंदणीकृत बांधकाम व घरेलू कामगार, रिक्षाचालक व फेरीवाल्यांना शासनाकडून प्रत्येकी दीड हजाराची मदत मिळणे अपेक्षित आहे. ही मदतीची रक्‍कम थेट संबंधित लाभार्थींच्या बॅंक खात्यात वर्ग केली जात आहे. मात्र, बहुतेक लाभार्थींना अर्ज कसा व कुठे करायचा याची माहितीच नाही. तर काही लाभार्थींचे बॅंक खात्यांची माहिती चुकली असून त्यांना त्याबाबतीत संपर्कही साधला जात नसल्याची स्थिती आहे. पहिल्या लाटेनंतर पुन्हा दुसऱ्या लाटेत कडक निर्बंध केल्यानंतर "जगावे की मरावे' असा प्रश्‍न हातावरील पोट असलेल्या या कामगारांपुढे निर्माण झाला. अशा परिस्थितीत तत्काळ मदत मिळणे अपेक्षित असतानाही त्यांना दीड महिन्यानंतरही मदत मिळालेली नाही. तर शहरात दोन हजार 356 नोंदणीकृत फेरीवाले असून त्यापैकी एक हजार 566 फेरीवाले मदतीसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित फेरीवाल्यांचे बॅंक डिटेल्स चुकले असून त्यांनी महापालिकेशी संपर्क करून त्यात दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन उपायुक्‍त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

Workers
शहर-जिल्ह्यात काय चालू व काय बंद ! वाचा सविस्तर

रिक्षाचालकांनी "येथे' करावा अर्ज...

सोलापूर शहरात 12 हजार 800 नोंदणीकृत रिक्षाचालक आहेत. त्यापैकी आतापर्यंत तीनशे रिक्षाचालकांनीच ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यातील बहुतेक जणांना अजूनही मदतीची रक्‍कम मिळालेली नाही. केवळ त्यांना आरटीओ कार्यालयाकडून मंजुरी मिळाली असून त्यांचे अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत. अजूनही शहरातील 12 हजार 500 रिक्षाचालकांनी अर्ज केलेले नाहीत. त्यासाठी त्यांनी transport.maharashtra. gov.in याठिकाणी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी केले आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे तीन अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली असून सुटी दिवशीही अर्ज पडताळणीचे काम सुरू असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

22 हजार बांधकाम कामगार मदतीपासून वंचित...

शहरात नोंदणीकृत बांधकाम व घरेलू कामगारांची एकूण संख्या एक लाख आठ हजारांपर्यंत आहे. त्यापैकी अंदाजित 88 हजार कामगारांची माहिती वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आली असून काहींना मदतही मिळाली आहे. परंतु, अजून 20 हजार कामगारांना मदत मिळालेली नाही. दरम्यान, शासनाने नोंदणीकृत कामगारांना प्रत्येकी दीड हजाराची मदत देताना मागील लॉकडाउनवेळी ज्यांना मदत मिळाली, त्यांची नावे पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ही मदत दिली जात असल्याची माहिती सहायक कामगार आयुक्‍त नीलेश येलगुंडे यांनी दिली. शहरात विडी कामगारांची संख्या मोठी असून त्यांना शासनाकडून मदत मिळणार नसल्याने कारखानदारांकडून जवळपास 45 हजार कामगारांना प्रत्येकी एक हजाराची मदत मिळवून दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com