

मंगळवेढा : पोलिस ठाण्यात दाखल अर्जाच्या चौकशीवरून भविष्यात होणाऱ्या गुन्ह्यातून आरोपीचे नाव कमी करण्यासाठी व तक्रारदाराच्या नातेवाइकाला अटकपूर्व जामीन देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी दहा लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यातील पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढा पोलिस ठाण्यातील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना सांगली विभागाच्या लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.