Sangola Crime : सांगोला तालुक्यात मंडळ अधिकाऱ्याच्या चालकाला ७ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; मंडल अधिकाऱ्यांसह चालकावर गुन्हा दाखल

सांगोला तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकाऱ्याच्या खाजगी चालकाला ७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
bribe

bribe

sakal

Updated on

सांगोला - सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडळ अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. ५) सापळा रचून मंडळ अधिकाऱ्याच्या खाजगी चालकाला ७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची कारवाई केली. या प्रकरणी मंडळ अधिकारी विजया महारुद्र नाईक (रा. इसबावी, ता. पंढरपूर) व त्यांचा खाजगी चालक वैभव पिराजी मोरे (रा. मुंढेवाडी, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com