
मंगळवेढा : माझ्या भावाला कोणतेही व्यसन नव्हते, फक्त दारूच्या व्यसनात माझा भाऊ मरून गेला. गाववाल्याला व सरपंचाला हात जोडून विनंती आहे की गावातील दारूधंदे बंद करा, असा आक्रोश तालुक्यातील अकोले येथील विनोद सरवदे या तरुणाने त्याच्या बंधू अनिल सरवदे यांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीत अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमात हात जोडून व्यक्त केला.