
सोलापूर : मुळेगाव तांडा येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या थालेसेमिया आजाराचा रुग्ण निखिल टोबू चव्हाण यास त्याची बहीण नेहा हिने बोनमॅरो दान करून आजारातून कायमचे मुक्त केले आहे. डॉ. सी. पी. रघुराम यांनी तपासण्यासह आर्थिक मदतीपर्यंत एकहाती मदत करून थालेसेमिया मुक्तीचा पॅटर्न उभा केला आहे.