सोलापूर : संपकाळात राज्यात 35 एसटीच्या गाड्यांची बांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus
सोलापूर : संपकाळात राज्यात 35 एसटीच्या गाड्यांची बांधणी

सोलापूर : संपकाळात राज्यात 35 एसटीच्या गाड्यांची बांधणी

सोलापूर : एसटी महामंडळाचे(MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी नोव्हेंबरपासून संप सुरू आहे. कर्मचारी संपावर असल्याने बस बांधणीच्या कामावर परिणाम झाला. पण, उपलब्ध कर्मचाऱ्यांनी दापोडी, औरंगाबाद, आणि नागपूर या तिन्ही कार्यशाळेतून 35 बस बांधणीचे काम पूर्ण केले आहे. ( build of 35 ST bus in the state during st workers protest )

हेही वाचा: आज विजयस्तंभ अभिवादन दिन

एसटी संपात बसचे चालक, वाहकांसह प्रशासकीय आणि कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. तरीही, राज्यातील तिन्ही विभागातील 70 टक्के कर्मचारी संपाऐवजी बस बांधणीत मग्न होते. दापोडी, औरंगाबाद व नागपूर मध्यवर्ती कार्यशाळेत एसटीच्या आयएस- 52 चेसिसवर नव्याने स्टील बॉडी बसविण्यात आली आहे. त्यासाठी कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नसल्याने अनेकांनी कामबंद करून आंदोलनात सहभागी होणेच पसंत केले. अजूनही 43 हजारांपर्यंत कर्मचारी संपात सहभागी आहेत. कमी पगार, कर्जबाजारी, नैराश्‍यातून जवळपास 50 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्यात सध्या 20 ते 30 टक्के एसटीची प्रवासी वाहतूक सुरू आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी 27 नोव्हेंबर रोजी वेतनवाढीचा निर्णय घेतला. तरीही, कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा मुद्दा सोडला नाही. निलंबन, पगार बंद, मेस्मा कायद्यानुसार कारवाईचा इशारा देऊनही कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदान सोडले नाही. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर काम सुरु ठेवण्याचे नियोजन परिवहन महामंडळाने केले आहे.

हेही वाचा: विजयस्तंभ अभिवादन दिन काळजी घेऊन साजरा करू या -KBM21B0205

ठळक बाबी

  1. तिन्ही कार्यशाळेतील 902 पैकी 702 कर्मचारी हजर

  2. एसटी गाड्यांच्या 50 टक्के उत्पादनास सुरवात

  3. एक बस बांधणीसाठी लागतो किमान 10 तासांचा वेळ

  4. पूर्ण क्षमतेने कर्मचारी उपस्थित राहिल्यास दरमहा 30 गाड्यांची होते बांधणी

  5. दरमहा तिन्ही विभागीय कार्यशाळेतून बांधल्या जातात 105 बस

सात महिन्यातील बस बांधणी

एप्रिल - 59, मे - 51, जून - 34, जुलै - 52, ऑगस्ट - 132, सप्टेंबर - 95, ऑक्‍टोबर - 90 नोव्हेंबर - 35.

हेही वाचा: विजयस्तंभ अभिवादन दिन कार्यक्रमाची तयारी पूर्ण

विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील एक महिन्यापासून कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र, प्रवाशांची गरज ओळखून महामंडळाने विभागीय कार्यशाळेतील उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बस बांधणी सुरुच ठेवली आहे. संप काळात 35 बस बांधणी केल्या आहेत.

- डॉ. शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top