Solapur Crime : देवदर्शनाला गेल्यावर व्यापाऱ्याचे घर फोडले; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास
शुक्रवारी (ता. १३) दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांना फोनवरून कळवले. तसेच जोडभावी पेठ पोलिसांना सांगितले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर बंद घराचा कडी-कोयंडा तुटल्याचे आढळले. तसेच घरातील दोन्ही कपाटही फोडल्याचे दिसून आले.
Empty house targeted during temple visit; ₹5.5 lakh in valuables stolen from trader's homeSakal
सोलापूर : शिर्डीला देवदर्शनासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. शुक्रवारी (ता. १३) दुपारी तीनच्या सुमारास शेळगीतील महेश थोबडे नगरात ही घटना उघडकीस आली.