
सांगोला : सांगोल्यातील जनावरांच्या बाजारात गाय खरेदी करण्यासाठी आलेले दोघेजण दुचाकीवरून गावाकडे जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी आहे. हा अपघात सांगोला-पंढरपूर रोडवरील मांजरी गावाजवळील बेले पेट्रोलपंपासमोर रविवारी (ता. २५) घडला.