

Bike Car Accident
sakal
मोहोळ - एका भरधाव जाणाऱ्या मारुती कार ने मोटरसायकलला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. हा अपघात बुधवार ता 17 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोहोळ-पंढरपूर-आळंदी पालखी मार्गावरील पेनुर शिवारातील पाटकुल फाट्या जवळील माने वस्ती जवळ झाला. इरफान सलीम कामले (वय-43) रा. पंढरपूर अशी मृताचे नाव आहे. तर आलिम जाकीर शेख (वय-28) रा. पंढरपूर असे जखमीचे नाव आहे. जखमीवर उपचारासाठी त्याला पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे.