‘सिनेट’साठी केलेले तुमचे मतदान होऊ शकते बाद? गुरुवारी मतदान, जाणून घ्या प्रक्रिया

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ‘सिनेट’साठी गुरुवारी (ता. २९) सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत मतदान होणार आहे. संस्थाचालक, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांसह अभ्यास मंडळ आणि विद्यापरिषदेच्या ३८ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात आहेत.
elections
electionssakal

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ‘सिनेट’साठी गुरुवारी (ता. २९) सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत मतदान होणार आहे. संस्थाचालक, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांसह अभ्यास मंडळ आणि विद्यापरिषदेच्या उमेदवारांनी जिल्ह्यातील ११० महाविद्यालयांना भेटी दिल्या आहेत. आता प्रचारासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवार सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत.

विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद आणि अभ्यास मंडळाच्या एकूण ३८ जागांसाठी ७५ उमेदवार आहेत. ‘पदवीधर’साठी आठ हजार ६४७, ‘शिक्षक’साठी ९५७ आणि संस्था प्रतिनिधींसाठी ५५ मतदार आहेत. दरम्यान, विद्यापरिषदेच्या आठ जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या असून, विज्ञान- तंत्रज्ञानाच्या खुल्या जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. अभ्यास मंडळात रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र आणि इंग्रजीच्या प्रत्येकी तीन जागांसाठी १२ उमेदवार आहेत. तसेच शैक्षणिक मूल्यमापनाच्या तीन जागांसाठी चार उमेदवार आहेत. निवडणूक नियोजनासाठी विद्यापीठाने ८८ कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती कुलसचिव डॉ. योगिनी घारे यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत शिक्षक, पदवीधरमधील प्रत्येकी एक तर विद्यापरिषदेच्या चार, ४३ पैकी ४० अभ्यास मंडळाच्या जागांवर ‘सुटा’चे वर्चस्व राहिले आहे. मागील पाच वर्षांतील विद्यार्थीकेंद्रित कामांच्या बळावर निश्चितपणे ‘सुटा’च निर्विवाद वर्चस्व मिळवेल, असा विश्वासही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कामाच्या बळावर ‘सुटा’ वर्चस्व राखेल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार तथा नोकरी मिळावी म्हणून कौशल्य आधारित शिक्षण मिळावे, ‘कमवा व शिका’चा लाभ अधिकाधिक मुलांना मिळावा, खेळासाठी क्रीडांगणे व्हावीत यासाठी ‘सुटा’ने नेहमीच संघर्ष केला आहे. प्राध्यापकांच्या प्रश्नांचीही सोडवणूक केली असून, यापुढील काळात देखील त्यासाठीच काम केले जाईल.

- प्रा. डॉ. नेताजी कोकाटे, जिल्हाध्यक्ष, सुटा

जाणून घ्या मतदान प्रक्रियेबद्दल...

  • पसंतीक्रमानुसार मतदान प्रक्रिया; ‘पदवीधर’साठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल

  • महाविद्यालयीन शिक्षकांसाठी गुलाबी, विद्यापीठ शिक्षकांसाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असणार

  • संस्था प्रतिनिधींसाठी हिरवी, विद्या परिषदेसाठी पिवळी व अभ्यास मंडळासाठी आकाशी रंगाची मतपत्रिका

  • मतपत्रिकेवर मतदान करताना निळ्या शाई पेनचा करा वापर; मराठी अथवा इंग्रजी अंकाचाच पसंतीक्रम लिहा

  • मतपत्रिकेवर १ अंकापासून पसंतीक्रम लिहिणे बंधनकारक; एका मतपत्रिकेवर दोनवेळा तोच पसंतीक्रम देता येणार नाही

  • मतपत्रिकेवर खाडाखोड नको, पसंतीक्रम अक्षरात नव्हे अंकात हवा; मतपत्रिकेवर कोणतेही चिन्ह लिहिल्यास मत बाद होईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com