Solapur : शालेय विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र रखडली; सेतू केंद्रातून ऑनलाईन अर्ज सादर; उत्पन्न दाखलाही वेळेवर मिळत नाही

१० आणि १२ वी च्या परीक्षा होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सीबीएससीचे निकाल जाहीर झाला आहेत.
शालेय विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र रखडली
शालेय विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र रखडलीSakal

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तहसील कार्यालयाचा कारभार एवढा ढेपाळला आहे की शालेय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे. तर उत्पन्न दाखल्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. याची दखल घेऊन त्वरित जात प्रमाणपत्र निकाली काढावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

१० आणि १२ वी च्या परीक्षा होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सीबीएससीचे निकाल जाहीर झाला आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल ही लवकरच जाहीर होणार आहे.

पुढील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राची आवश्यकता असते. यासाठी सिंदखेडराजा तालुक्यातील २ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सेतू केंद्रातून ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत.

त्याचबरोबर उत्पन्न दाखला हाही महत्त्वाचा असल्याने त्यालाही विलंब लागत आहे पुर्वी उत्पन्न दाखला हा काही तासांतच मिळत असे. आज मात्र त्यासाठी हेलपाटे घालावे लागतात. साखरखेर्डा ते सिंदखेडराजा अंतर ६० कि मी. चे असल्याने जाणे-येणे कठीण आहे.

एकतर तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बस नाही. तुटक तुटक प्रवास करून विद्यार्थी गेला तर अधिकारी ठिकाणावर सापडत नाही. सापडला तर निवडणुकीची कामे आहेत, नंतर या, असे नकारात्मक उत्तर मिळते.

१० वीचा निकाल लागल्यानंतर ११ वी प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्र लागते. या सर्व बाबींची दखल घेऊन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र कसे लवकर मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी येत आहे. याची दखल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि जात प्रमाणपत्र याच आठवड्यात देण्याची तसदी घ्यावी.

- रामभाऊ जाधव, माजी उपाध्यक्ष, जि.प.

निवडणूक प्रक्रियेत सर्व कर्मचारी असल्याने जात प्रमाणपत्रासाठी विलंब लागत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना हजर ठेवून कॅम्प आयोजित करण्यात आला आहे आणि जात प्रमाणपत्र मिळेल याची दखल घेतली जाईल.

- प्रविण धानोरकर तहसीलदार, सिंदखेडराजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com