गुन्हेगारीला रोखण्यासाठी सीसीटीव्ही, स्पीकर अन्‌ सायरन !

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही, स्पीकर व सायरन !
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही, स्पीकर व सायरन !
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही, स्पीकर व सायरन !Canva
Summary

मोहोळ तालुक्‍यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीकर व सायरन बसवणार.

वाळूज (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील (Mohol Taluka) ग्रामीण भागात वन्य प्राण्यांचा वावर, चोऱ्या व दरोडे, भांडण-तंटे यांसारखे गुन्हे (Crime) होऊ नयेत तसेच कोरोनाचे (Covid-19) रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील गावा- गावांमध्ये ग्रामसुरक्षा दल (Gramsuraksha Dal) सक्रिय करणे, सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवणे, स्पीकर व सायरन, जिओ फॅन्सीऍप या संदर्भात वाळूज (ता. मोहोळ) ग्रांमपंचायत येथे मोहोळ तालुक्‍याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर (PI Ashok Saikar) यांनी आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या. या वेळी त्यांच्या समवेत मोहोळ पोलिस ठाण्याच्या गुप्तवार्ता विभागाचे नीलेश देशमुख (Neelesh Deshmukh), नरखेड बीटचे गणेश पोफळे (Ganesh Pophale), सत्यवान जाधव (Satyawan Thorat) उपस्थित होते.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही, स्पीकर व सायरन !
मुख्यमंत्र्यांवर माझं खूप प्रेम! शिवसैनिकांच्या संतापानंतर भरणेंची प्रतिक्रिया

याविषयी काढलेल्या सूचनापत्रकात, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेविषयी उपाययोजना, ग्रामस्थांनी घ्यावयाची खबरदारी, तंटामुक्त समितीने गावात प्रभावीपणे काम करणे, अदखलपात्र, शेतीविषयक गुन्हे, कौटुंबिक वाद स्थानिक स्तरावर पारदर्शकपणे मिटवत असताना गाव कारभाऱ्यांनी त्यात राजकारण न आणण्याच्या सूचना देताना, यात राजकारण केल्याचे आढळल्यास संबंधिताचे पद रद्द करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. गावामध्ये पोलिस मित्रांच्या मदतीने कमीतकमी 25 जणांचे ग्रामसुरक्षा दल तयार करावे. या दलाच्या सदस्यांनी रात्री 12 ते पहाटे पाचपर्यंत आळीपाळीने गस्त घालावी. त्यामुळे चोरी, दरोडे, घरफोड्यांसह गंभीर गुन्हे टाळता येतील. गावाचे मुख्य रस्ते, प्रवेशद्वार, मुख्य चौक येथे चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गुन्हेगारीला आळा बसेल. शिवाय गुन्हेगारांची ओळखही पटेल तसेच वन्य प्राण्यांपासून सतर्क राहून संकट टाळता येईल. गुन्हेगारांना तत्काळ पकडण्यासाठीच्या फॅन्सी ऍपची माहिती या वेळी देण्यात आली..

या वेळी वाळूज (दे) येथील पोलिस पाटील अर्चना कादे, कुमार कादे, उपसरपंच दिनकर कादे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कादे, रमेश पाटील, आरोग्य विभागाचे डॉ. श्री. झेंडे, ग्रामसेवक मानसिंग जाधव, सुहास घाडगे, शिरीष कादे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही, स्पीकर व सायरन !
सोलापुरात सोने खरेदी 6 कोटींनी वाढली! दरातील चढ-उतार सुरूच

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात "आपले गाव आपली सुरक्षा' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यासाठी गावोगावी जाऊन प्रत्यक्ष बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे.

- अशोक सायकर, पोलिस निरीक्षक, मोहोळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com