
मोहोळ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसा पासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करीत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्याने मोहोळ येथील समाज बांधवांनी शिवाजी चौकात एकमेकांना पेढे भरवुन, फटाके फोडून जल्लोष केला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस व मनोज जरांगे यांचे आभार मानले.