
-अरविंद मोटे
सोलापूर : मध्य रेल्वेच्या दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांवर केवळ कन्नड, तेलुगू भाषेतील फलक आहेत. येथे देवनागरी लिपीतून मराठी हिंदी भाषेतील तसेच इंग्रजी भाषेतील फलकांचा अभाव असल्याने मराठी माणसांसह उत्तर भारतीय प्रवाशांची गैरसोय होत आहे. मध्य रेल्वेला मराठी हिंदी भाषेचे वावडे आहे का प्रश्न मराठीप्रेमींमधून होत आहे.