तिसऱ्या लाटेच्या नियोजनात सोलापूर पुढे - सीईओ स्वामी

तिसऱ्या लाटेच्या नियोजनात सोलापूर पुढे - सीईओ स्वामी
Corona
CoronaCanva

तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेने लहान मुलांच्या आरोग्य तपासणीची मोठी मोहीम हाती घेतली आहे.

सोलापूर : राज्यातील इतर जिल्हा परिषदा कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेचाच अद्याप मुकाबला करत आहेत. तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेने लहान मुलांच्या आरोग्य तपासणीची मोठी मोहीम हाती घेतली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्‍यक असलेले नियोजन करण्यात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात सर्वांत पुढे असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (CEO Dilip Swamy) यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. (CEO Dilip Swamy said that Solapur is at the forefront of planning for the third lot)

Corona
नरेंद्र पाटील म्हणाले, ज्यांना अधिवेशनच नको त्यांना मोर्चे कसे चालतील?

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर हाती घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत कोरोनाग्रस्त, कोरोनासदृश आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या मुलांच्या पालकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाग्रस्त व कोरोनासदृश असलेल्या मुलांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात जवळपास 16 हजारांहून अधिक बालकांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. लहान मुलांवर उपचार करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांची समिती, लहान मुलांसाठी आवश्‍यक असलेला औषधसाठा, उपचाराची साधनसामग्री याची जुळवाजुळव केली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेने केलेली ही तयारी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांत प्रथम झाली असल्याचेही सीईओ स्वामी यांनी सांगितले.

Corona
राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयावर केली अज्ञातांनी दगडफेक !

दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी "माझे गाव, कोरोनामुक्त गाव' हे अभियान हाती घेतले होते. पहिली लाट ओसरली होती त्यावेळी हे अभियान हाती घेतले होते. हे अभियान ज्यावेळी हाती घेतले त्यावेळी काही जणांनी हे अभियान आता कशासाठी? असा प्रश्‍न उपस्थित केला होता. या अभियानामुळे दुसऱ्या लाटेत गाव पातळीवरील यंत्रणा सज्ज झाली. दुसऱ्या लाटेत राबविण्यात आलेल्या "गाव तिथे कोव्हिड सेंटर' या अभियानामुळे गावातील कोरोनाबाधितांवर गावातच उपचार करणे शक्‍य झाले. पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 100 गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. या अभियानातून गावातच उपचार मिळत असल्याने कोरोना चाचणीसाठी अनेकजण स्वत:हून पुढे आल्याचेही सीईओ स्वामी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com