कार्यक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याचे ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही

Chairman Samadhan Avtade testified that the factory will not be closed until the last farmer in the field is crushed.jpg
Chairman Samadhan Avtade testified that the factory will not be closed until the last farmer in the field is crushed.jpg
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : कार्यक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याचे ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नसल्याची ग्वाही अध्यक्ष समाधान आवताडे यांनी दिली.

संत दामाजी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात उत्पादीत झालेल्या 3 लाखाच्या साखर पोत्याचे पूजन व संचालक मंडळाची यशस्वीरित्या पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या सपत्नीक सत्कारावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी हे होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष आवताडे म्हणाले की, चालू हंगामात कमीत कमी खर्चात कामकाज होवून कारखाना सुरळीत चालू असल्याने सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सत्तेवर आल्यापासून असे नवीन प्रयोग केलेले आहेत. परिसरात कारखाने सरकारी ध्येय धोरणे, असंख्य संकटातून चालविणे जिकिरीचे झाले. चालू वर्षी आपले सहा लाख मे.टनाचे गाळपाचे उद्दिष्ट होते, परंतु ऊसाचे हेक्टरी टनच फारच कमी झाल्यामुळे ते पूर्ण होवू शकत नाही.

कामगारांनी संस्थेसाठी मोठे योगदान दिले असून प्रत्येक कामगारांना हुद्दा देण्याचा प्रयत्न आहे. कामगारांना कामाप्रमाणे हुद्दा देताना यामध्ये कोणतेही राजकारण न करता ज्या चांगले काम केलेल्या  कर्मचाऱ्यांना न्याय देणार आहे. एफ.आर.पी. शेतकऱ्याची ऊस बिले व वाहतुकीची बिले देवू शकलो. प्रास्ताविकात कार्यकारी संचालक झुंजार आसबे म्हणाले की, संचालक मंडळाचे मार्गदर्शनानुसार आपण चालू हंगाम अडचणीवर मात करीत गाळप सुरु केलेला आहे.  कारखान्याच्या इतिहासात प्रथमच संचालक मंडळांनी पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे. कामगारांनी 40 ते 60 टक्के पगारावर कामकाज केले.

यावेळी जेष्ट संचालक बबन आवताडे, प्रा,येताळा भगत, राजेद्र सुरवसे, दत्तात्रय जमदाडे, लक्ष्मण जगताप, राजीव बाबर, राजेंद्र पाटील, शिवयोग्याप्पा पुजारी, बापू काकेकर, बसवेश्वर पाटील, मारुती थोरबोले, लक्ष्मण नरुटे, भुजंगराव आसबे, सुरेश भाकरे, बबनराव आवताडे, सचिन शिवशरण, अशोक केदार, स्मिता म्हमाणे, कविता निकम, संजय पवार यांचेसह ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, सिझन कामाचे कंत्राटदार, कामगार संघटना उपस्थित होते. आभार संचालक सचिन शिवशरण यांनी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Mohol Taluka Appoints Administrators For 73 Gram Panchayats As Eight Officers Shoulder Charge Of Multiple Villages
Amol Shinde Comments On Deshmukh Camp And BJP Rivals As Chandrakant Patil Says Der Hai Andher Nahi
Pandharpur Crime 55 Year Old Woman Held for Allegedly Killing 70 Year Old Lover DNA Report Reveals Victim Identity
Marathi News Esakal
www.esakal.com