
पंढरपूर : माझे जिवींची आवडी ।,पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥ पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणीं वेधलें ॥२॥ जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥३॥ बापरखुमादेविवर सगुण निर्गुण, । रुप विटेवरी दाविली खुण ॥४॥
राज्याच्या विविध भागातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये आज चैत्री यात्रेचा अनुपम सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. दरम्यान, चैत्री यात्रेची विठ्ठलाची नित्यपूजा मंगळवारी पहाटे मंदिर समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते तर रुक्मिणीची नित्य पूजा मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.