
-भारत नागणे
पंढरपूर : गुढीपाडव्याला सुरू झालेली विठ्ठल रुक्मिणीची चंदन उटीपूजेची सांगता १३ जूनला होणार आहे. या पूजेतून विठ्ठल मंदिर समितीला १४ लाखांचे उत्पन्न मिळाले असून या पूजेसाठी ५३ किलो सुगंधी चंदनाचा वापर करण्यात आला आहे. मृग नक्षत्रापर्यंत चंदन उटी पूजा केली जाते. परंतु यावर्षी १३ जून हा शुभ दिवस असल्याने या दिवशी चंदन उटी पूजेची विधीवत सांगता केली जाणार जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिली.