मंगळवेढा :पंढरपूर विजयपूर रेल्वेसाठीचा फडणवीसाचा दौरा निराशाजनक

फडणवीसाच्या मंगळवेढा दौय्रात प्रलंबित पंढरपूर फलटण रेल्वेमार्गासाठी राज्याचा हिश्सा देण्याची खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या साक्षीने
devendra fadnavis
devendra fadnavissakal
Updated on

मंगळवेढा :उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसाच्या मंगळवेढा दौय्रात प्रलंबित पंढरपूर फलटण रेल्वेमार्गासाठी राज्याचा हिश्सा देण्याची खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या साक्षीने राज्यसरकारची तयारी दाखवली तशीच तयारी खा जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या साक्षीने कर्नाटकातील भाविक पंढरपूरशी अधिक वेगाने जोडण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर-विजयपूर या रेल्वेमार्गासाठी न दाखविल्याने मंगळवेढेकरुन फडणवीसाचा मंगळवेढा दौरा रेल्वेच्या बाबतीत निराशाजनक ठरला असे म्हणावे लागेल

                    पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्रबरोबर सर्वाधिक जास्त भाविक कर्नाटकातून चालत येतात. परंतु त्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, या दृष्टीने तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपूर-विजयपूर हा 108 किमीचा रेल्वेमार्ग 2014-15 मध्ये मंजूर करून घेतला. त्यासाठी 1294 कोटी खर्च अपेक्षित होता. त्या मार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या मार्गासाठी निधी दिला नाही. त्यामुळे हा प्रश्‍न अद्याप रेंगाळलेल्या अवस्थेत आहे.रेल्वेमार्गाचा प्रश्‍न मार्गी लागल्यास आणि पंढरपूर-लोणंद रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला कर्नाटकातील प्रवाशी व मालवाहतूक उत्तर भारतात जाण्यासाठी सोलापूरमार्गे वाढणारे अंतर व खर्च, वेळेची बचत होणार आहे. शिवाय पंढरपूर-मंगळवेढा या परिसरातील द्राक्षे, डाळिंब, ज्वारी, साखर व इतर शेतमाल दक्षिण व उत्तर भारतामध्ये पाठवणे शक्य होणार आहे.

विजयपूर-पुणे हे अंतर 374 किमी आहे. मात्र, हा रेल्वे मार्ग झाल्यास हे अंतर 314 किमी होऊन 60 किमी अंतराची बचत होणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्यानंतर खा.शरद बनसोडे यांनी नेटाने प्रयत्न करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी देखील त्यामध्ये म्हणावे तसे लक्ष दिले नाही. विद्यमान खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्याकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. स्व.भालके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, रेल्वे राज्यमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली.दरम्यान पोटनिवडणुकीतील विजयानंतर दोन महिन्यातच आ. समाधान आवताडे यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत 27 जुलै 2021 रोजी भेट घेवून प्रलंबित पंढरपूर विजयपूर सह सांगोला सोलापूर या नव्या रेल्वेमार्गाची मागणी केली स्थानिक लोकप्रतिनिधी,खासदारसह राज्यातील व केंद्रातील सरकारच एकाचे पक्षाचे असताना आ आवताडेनी केलेल्या केद्र सरकारकडून दुर्लक्ष झाले, सुमारे एक हजार कोटी खर्चच्या या रेल्वेमार्गासाठी विजयपूर व जत येथील लोकप्रतिनिधींकडूनही सातत्याने पाठपुरावा होत आहे.नव्या सर्वेक्षणानुसार या मार्गाचे अंतर 108 किमीऐवजी जवळपास 85 किमी इतके होत असून त्याचा खर्च एक हजार कोटी आसपास होऊ शकतो. त्यासाठी कोकण रेल्वेप्रमाणे राज्य शासनाने यामध्ये आर्थिक हातभार लावला तर हा प्रश्‍न मार्गी लावू शकतो, असे मत रेल्वेच्या एका अधिकार्‍याने व्यक्त केले.नंदूरच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पंढरपूर फलटणसाठी राज्य सरकार हिश्शा देण्याची तयारी दर्शीवल्याने हा प्रश्‍न मार्गी लागेल पण तशीच तयारी पंढरपूर विजयपूरसाठी दाखवल्यास हा ही प्रश्‍न मार्गी लागेल पण यावर भाष्य न केल्यामुळे मंगळवेढेकरांची निराशा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com