चिखलठाणमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई; तीन टिपर पकडले, बोट पाण्यात बुडवली 

Sand Mafia
Sand Mafia
Updated on

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करण्यात आली असून, ही कारवाई बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चिखलठाण (ता. करमाळा) येथे करण्यात आली. या कारवाईत तीन टिपर पकण्यात आले आहेत. तर वाळू उपसा करणारी बोट पाण्यात बुडविण्यात आली आहे. 

याबाबत सोलापूर येथील पोलिस मुख्यालयाचे पोलिस शिपाई लक्ष्मण चिमाजी हेमाडे यांनी फिर्याद दिली आहे. सोलापूर येथील पोलिस पथकास करमाळा तालुक्‍यातील चिखलठाण येथे भीमा नदीत अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधार सोलापूर येथील मुख्यालयातील पोलिस पथकाने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशाने सापळा रचून चिखलठाण येथील कोटलिंग मंदिर परिसरात भीमा नदी पात्रात वाळू उपसा करणारी बोट व वाळू वाहतूक करणारे टिपर पकडण्यासाठी सापळा लावला.

यात वाळू उपसा करणारी बोट नदी पात्रात बुडविण्यात आली तर वाळू वाहतूक करणारे तीन टिपर पकडले आहेत. यापैकी एका टिपर चालकाने टिपरमधील वाळू चिखलठाण येथे रस्त्यावर खाली करून टिपर चंद्रकांत सरडे यांच्या शेतात लावून पळ काढला. इतर दोन चालकांना विचारले असता, एकाने महादेव भगवान शिंदे (रा. पोथरे, ता. करमाळा) तर दुसऱ्याने सुधीर अंकुश वायकुळे (रा. खांबेवाडी, रा. करमाळा) असे नाव सांगितले. 

हे दोन्ही टिपर शिवाजी हरिभाऊ नरुटे (रा. खांबेवाडी) यांच्या मालकीचे असल्याचे या चालकांनी सांगितले. पकडण्यात आलेल्या दोन टिपरला क्रमांकच नाहीत तर एका टिपरचा क्रमांक एमएच 42/एक्‍यू 2930 असा आहे. याबाबत करमाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com