
सोलापूर/वडाळा : पती विनाथांबा बसचे तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबले होते. त्यांची पत्नी त्यांना सुटे पैसे द्यायला गेल्यानंतर एका महिलेने त्यांच्या तीनवर्षीय मुलीचे अपहरण केले. मात्र, ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घाबरून अपहरण केलेल्या महिलेने तिचे पैंजण, सोन्याचे रिंग काढून घेऊन तिला मोडनिंब (ता. माढा) येथील एका मंगल कार्यालयाजवळ सोडले. मुलगी सापडल्याची खबर मिळताच त्या दांपत्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरविल्याने मुलगी चार तासांतच आई-वडिलांच्या कुशीत विसावली.