child marriage police custody to husband till 19 march solapur police action
child marriage police custody to husband till 19 march solapur police actionSakal

Solapur Crime : अल्पवयीन मुलीशी विवाह; पतीला १९ मार्चपर्यंत कोठडी; हॉस्पिटलमध्ये तपासणीवेळी बालविवाह उघड

सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासू व मुलीच्या आई- वडिलांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासू व मुलीच्या आई- वडिलांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या पतीला अटक केली असून न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (ता. १९) पोलिस कोठडी ठोठावली आहे.

सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मुलीचा विवाह तिच्या नात्यातील २३ वर्षीय तरुणाशी काही महिन्यांपूर्वी झाला होता. विवाहानंतर गर्भवती राहिलेली अल्पवयीन मुलगी तपासणीसाठी दवाखान्यात गेली होती. त्यावेळी त्या मुलीचा विवाह अल्प वयात झाल्याची बाब लक्षात आली.

सदर बझार पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्यासंदर्भात शहानिशा केली. पोलिस उपनिरीक्षक संजिवनी व्हट्टे यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या पतीला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालविवाह व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन मुलगी सध्या साडेसतरा वर्षांची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, दवाखान्यात पोलिस आल्याचे समजताच मुलीची सासू तेथूनच पसार झाली. तर मुलीचा बालविवाह झाल्याचे पोलिसांना समजल्याने तिचे आई- वडील देखील पळून गेल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

त्यांचा शोध सुरू असून हा विवाह गुपचूप पद्धतीने घरातच साध्या पद्धतीने झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार विवाह लावून देणाऱ्यांविरुद्ध देखील गुन्हा दाखल होतो. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यात सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com