वडिलांच्या पक्षी निरीक्षणाचा छंद जडला मुलांनाही ! कुर्डुवाडीतील पक्ष्यांची माहिती व फोटोही केले संग्रहित 

Bhosale_Sumant
Bhosale_Sumant
Updated on

कुर्डुवाडी (सोलापूर) : आपल्या वडिलांच्या पक्षी निरीक्षणाच्या छंदाचे अनुकरण करत अभ्यासातून वेळ काढत चार मुले निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासत आहेत. त्यांनी कुर्डुवाडी परिसरातील पक्ष्यांची छायाचित्रे काढून त्यांची माहिती देखील संग्रहित करून ठेवली आहे. 

शर्वरी शरदचंद्र भोसले (वय 13), यशवर्धन शरदचंद्र भोसले (वय 9), अर्चित उदय सुमंत (वय 14) व तनया उदय सुमंत (वय 10) अशी त्या मुलांची नावे आहेत. 
आर्किटेक्‍ट शरदचंद्र भोसले, उद्योजक उदय सुमंत, डॉ. लक्ष्मण फुलारी, डॉ. संतोष सुर्वे हे सर्वजण उजनी, कुंभारगाव, आष्टी, येवती, कोरेगाव, लऊळ येथे पक्षी निरीक्षण व छायाचित्रणासाठी जात निसर्गात नेहमीच रममाण होतात. वडिलांपासूनच या मुलांनी प्रेरणा घेतली आहे. 

शरदचंद्र भोसले यांनी घराच्या परिसरात विविध झाडे जोपासली आहेत. त्यावर पक्ष्यांनी घरटी केली आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब न करता त्यांची मुले या पक्ष्यांचे निरीक्षण करतात. काही दिवसांपूर्वी घरट्यातून पक्ष्याचे पिल्लू खाली पडले व जखमी झाले. शर्वरी व यशने त्या पिल्लाची देखभाल करत त्याचा जीव वाचवला. घरटे बांधण्याच्या सुरवातीपासून पूर्ण होईपर्यंत व पक्ष्यांनी अंडी घातल्यापासून पिल्लू बाहेर येईपर्यंत दररोज त्याचे फोटो काढून त्यांनी नोंदी ठेवल्या आहेत. 

उदय सुमंत यांच्या घराच्या परिसरातसुद्धा अनेक पक्षी येतात. अर्चित व तनया यांना त्यांच्या निरीक्षणाची आवड असल्याने या पक्ष्यांचे फोटो काढून त्याबद्दल माहिती देखील संग्रहित करून कॉफीटेबल बुक तयार केले आहे. दोघांकडे विशेष टेलिफोटोच्या लेन्ससह डीएसएलआर कॅमेरे आहेत. त्याद्वारे फोटोंसह व्हिडिओ देखील काढत आहेत. 

कुर्डुवाडी परिसरातील पक्षी 
स्केली ब्रिस्टेड मुनिया (ठिपकेवाली मुनिया), ग्रीन बी ईटर (वेडा राघू), टेलर बर्ड (शिंपी), पर्पल सनबर्ड, कॉपर स्मिथ बार्बेट (तांबट), किंगफिशर (खंड्या), ओरिएंटल आय व्हाईट (चष्मेवाला), भांगपाडी मैना, ब्लॅक शोल्डर काईट (कापशी घार), दयाळ, ग्रे हॉर्न बिल. 

कुंभार गाव आणि आष्टी तलाव येथील पक्षी 
फ्लेमिंगो, पेंटेड स्टॉर्क, किंगफिशर, व्हाईट नेक्‌ड स्टॉर्क, हॅरिअर, कॉमन कुट, स्पॉटबिल्ड डक, ओपन बिल स्टॉर्क आदींसह इतर. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com