
सोलापूर - मोबाईलवर रिल्स पाहण्याच्या सवयीने मुले व मुली स्वमग्नतेच्या चक्रात सापडून त्यांच्या वर्तणुकीवर वाईट परिणाम दिसतात. मेंदूतील व्यसनामुळे उत्तेजित होणारा रिवार्ड पाथवे हा भाग रिल्स पाहण्याने उत्तेजित होतो. त्यामुळे रिल्स हे व्यसनाइतकी किंबहूना अधिक भयंकर परिणाम करणारी ठरतात.