सोलापूर : सोलापूर महापालिकेची सिटी बस मंगळवारी बोरामणी रस्त्यावर जळून खाक झाली. प्रसंगावधान राखून बस चालकाने बस लगेचच थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. कीर्ती गोल्ड ऑइल मिलसमोर दुपारी ही घटना घडली.