शहरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! वाचा, कोणाची कुठे झाली बदली

शहरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! वाचा, कोणाची कुठे झाली बदली
शहरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! वाचा, कोणाची कुठे झाली बदली
शहरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! वाचा, कोणाची कुठे झाली बदलीGallery
Updated on: 
Summary

पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पोलिस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या.

सोलापूर : पोलिस महासंचालक (Director General of Police) कार्यालयाकडून पोलिस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या (Assistant Police Inspector) बदल्या झाल्या. बदलून आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना नियुक्‍ती देण्यासाठी शहरातील पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सात सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह 15 उपनिरीक्षकांचा समावेश आहे. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांनी शुक्रवारी बदलीस पात्र अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.

शहरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! वाचा, कोणाची कुठे झाली बदली
गणेश गुंडमींची गो-उत्पादने ! चक्क फेसवॉशपासून बाम व राख्यांची निर्मिती

त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले. सचिन मंद्रूपकर (फौजदार चावडी पोलिस ठाणे) यांची सलगर वस्ती पोलिसांत बदली झाली आहे. तर प्रवीण दाईंगडे (जोडभावी पेठ पोलिस ठाणे), सिद्धेश्‍वर मुरकुटे (एमआयडीसी पोलिस ठाणे) यांची फौजदार चावडी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. भाग्यश्री जाधव, सचिन माळी (एमआयडीसी पोलिस ठाणे) यांची बदली अनुक्रमे शहर वाहतूक शाखा आणि जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात झाली आहे. तसेच नागाबाई गंपले (सदर बझार पोलिस ठाणे) यांची बदली विजापूर नाका पोलिस ठाण्यात तर अल्फाज शेख (सदर बझार पोलिस ठाणे) यांची जेलरोड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. माधव बेंबडे (विजापूर नाका पोलिस ठाणे) यांची बदली सदर बझार पोलिस ठाण्यात तर आनंद मळाळे (शहर वाहतूक शाखा) यांची सदर बझार पोलिस ठाण्यात आणि दत्तात्रय वाघ (शहर वाहतूक शाखा) यांची जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. अश्‍विनी तळे (फौजदार चावडी पोलिस ठाणे) यांची जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात तर नागेश होटकर (सायबर पोलिस ठाणे) यांची शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली. विशेंद्रसिंग बायस (सायबर पोलिस ठाणे) यांची बदली सदर बझार पोलिस ठाण्यात तर करुणा चौगुले (महिला सुरक्षा कक्ष) यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणि संजय मोतेकर (नियंत्रण कक्ष) यांची जेलरोड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

शहरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! वाचा, कोणाची कुठे झाली बदली
सोलापूरच्या डॉ. ईशा वैद्य यांची 'मिस इंडिया' स्पर्धेसाठी निवड

"या' सहाय्यक पोलिस निरीक्षकांची बदली

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ गुरव यांची बदली "बीडीडीएस' (बॉम्बशोधक व नाशक पथक) येथे करण्यात आली आहे. तसेच संजीव भोसले (शहर वाहतूक शाखा) यांची विजापूर नाका पोलिस ठाण्यात तर रमेश चिंताकिंदी (शहर वाहतूक शाखा) यांची जेलरोड पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. कोर्ट पैरवी म्हणून काम पाहणारे तुकाराम जमादार यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. नितीन पवार (बीडीडीएस) यांची बदली शहर वाहतूक शाखेला तर पूनम बागल- घाडगे यांची बदली परवाना शाखेत करण्यात आली आहे. तसेच श्रीनाथ महाडिक यांच्याकडे सायबर पोलिस ठाण्याचा पदभार सोपविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Auto Rickshaw and Pratap Sarnaik
Solapur Water Supply Scheme Gets Approval for 1350 Crore Project to Ensure Daily Water Supply Across the City
Pandharpur Corridor News Affected Residents Protest Land Acquisition Notices and Demand Protection of Their Properties
Assembly Session Police Alert Strict Orders to Police Inspectors Against Illegal Businesses and Traffic Violations in the City