esakal | चिंताजनक ! शहरात दररोज सरासरी दहाजणांचा कोरोनामुळे मृत्यू; मृत्यूदरात राज्याच्या टॉप टेनमध्ये सोलापूर

बोलून बातमी शोधा

corona_death.

कोरोना मृत्यूदर खूपच वाढला असून सोलापूर शहर पुन्हा राज्यातील पहिल्या सहा शहरांमध्ये पोचले आहे. नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे, साताऱ्यानंतर सोलापूरचा क्रमांक लागतो. सद्य:स्थितीत रुग्णसंख्येच्या प्रमाणात सोलापूर शहराचा मृत्यूदर 4.22 टक्‍के आहे. 

चिंताजनक ! शहरात दररोज सरासरी दहाजणांचा कोरोनामुळे मृत्यू; मृत्यूदरात राज्याच्या टॉप टेनमध्ये सोलापूर
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट सुसाट सुटली असून, शहरात दररोज सरासरी दहा जणांचा मृत्यू होत आहे. मे 2020 मध्ये शहराचा मृत्यूदर 10.50 होता तर जूनमध्ये 11.46 टक्‍क्‍यांवर गेला होता. आता रुग्णसंख्या दुप्पट झाल्याने मृत्यूदर कमी असल्याचे चित्र आहे. परंतु, प्रत्यक्षात मृत्यूदर खूपच वाढला असून सोलापूर शहर पुन्हा राज्यातील पहिल्या सहा शहरांमध्ये पोचले आहे. नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे, साताऱ्यानंतर सोलापूरचा क्रमांक लागतो. सद्य:स्थितीत रुग्णसंख्येच्या प्रमाणात सोलापूर शहराचा मृत्यूदर 4.22 टक्‍के आहे. 

सोलापूर शहरात आतापर्यंत दोन लाख 33 हजार संशयितांची टेस्ट करण्यात आली आहे. त्यात 19 हजार 700 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यातील 827 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आता शहरात दररोज सरासरी दहा रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे. सोमवारी ग्रामीण भागात 641 जण पॉझिटिव्ह आढळले असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पंढरपूर येथील हरिदास वेस येथील 36 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. 

ग्रामीण भागात आतापर्यंत सहा लाख 86 हजार 795 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यात तब्बल 52 हजार 511 जण पॉझिटिव्ह आले असून त्यातील एक हजार 300 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील मृत्यूदर पहिल्या लाटेच्या तुलनेत आता पुन्हा वाढू लागला आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करूनही कोरोनाचे रुग्ण व मृत्यूदर कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे. उशिरा रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने ऑक्‍सिजन बेड, आयसीयू बेड व व्हेंटिलेटरदेखील कमी पडू लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. 

शहराचा 4.22 सरासरी मृत्यूदर 
पॉझिटिव्ह आलेल्या एकूण रुग्णसंख्येच्या प्रमाणात मृत्यूदराची नोंद केली जाते. सोलापूर शहराचा सरासरी मृत्यूदर 4.22 टक्‍के असून एप्रिल महिन्यातील मृत्यूदर 2.98 टक्‍के इतका आहे. 
- शिरीष धनवे, 
वित्त व लेखा अधिकारी, सोलापूर महापालिका 

शहरात अंत्यविधीसाठी कमी पडतेय स्मशानभूमी 
शहरातील मोदी स्मशानभूमी, शांती चौक स्मशानभूमी, मुस्लिम स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी, लिंगायत स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मोदी स्मशानभूमीतील एक विद्युत दाहिनी बंद पडली असून एकाच विद्युत दाहिनीवर अंत्यविधी केले जात आहेत. आता मृतांची संख्या वाढू लागल्याने अक्‍कलकोट रोडवरील शांती चौक स्मशानभूमीत गॅस दाहिनी सुरू केली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल