सोलापूरकरांकडून पर्यावरणपूरक रंगांची उधळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 रंगांतून चेहर्यावर फुललेला आनंद.

सोलापूरकरांकडून पर्यावरणपूरक रंगांची उधळण

सोलापूर : हातात रंगाचे पुडे. मित्र व मैत्रिणींच्या समवेत गल्लीबोळात धूम.अनेक रंगांतून चेहर्यावर फुललेला आनंद. शहरभरात रंगपंचमीच्या निमित्ताने आबालवृद्धांच्या सहभागातून रंगांची उधळण सणाचा आनंद वाढवणारी ठरली. आज सकाळपासून शहरात रंगपंचमीचा उत्साह सुरू झाला. लहान मुलांनी रंग विकत आणून प्रत्येक गल्लीत मित्रांना रंगात भिजवले. त्यासोबत ही मुले नृत्याच्या धुंदीत मग्न झाली होती. लहान मुलांनी रंगांच्या पिचकार्या एकमेकांच्या अंगावर उडवत धूम उडवून दिली.

कॉलेजच्या मुलांचा उत्साह तर यापेक्षा अधिक होता. दुचाक्यांवर मित्रांना सोबत घेत इतर मित्रांच्या घरी जाऊन त्यांना रंग लावण्याचा उत्साह पाहण्यासारखा होता. दोस्तांना सोबत घेऊन रंग खेळत असताना त्यांच्या चेहर्यावरचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. कॉलेजच्या मुलींनी देखील मैत्रिणींना सोबत घेत रंग खेळला. रंग खेळत असताना अनेक मुली सेल्फी काढण्यात मग्न झाल्या होत्या. एकत्र कुटुंबांमध्ये रंगपंचमीचा आनंद खूपच अधिक असतो.

घरातील सर्व सदस्यांची रंगपंचमी अनेक परिवारांमध्ये साजरी झाली. दरवर्षी लोधी गल्लीतील रंगपंचमीचा सण या वेळी मात्र साधेपणाने गल्लीतच साजरा झाला. रंगाच्या गाड्यांना परवानगी नसल्याने आबालवृद्धांनी बेडर पूल भागातच रंग उधळण्याचा आनंद घेतला. यासोबत भजी, जिलेबी, फाफडा यांसारख्या खाद्यपदार्थाचा आनंद घेतला जात होता. अनेकांनी शहराबाहेर शेतात जाऊन रंगपंचमीचा सण साजरा केला.

Web Title: City Youth Scattering Eco Friendly Colors Solapurkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SolapurYouthSakale sakal
go to top