
राज्यातील बोगस वैद्यकीय प्रयोगशाळा रडारवर
ब्रह्मपुरी : सोलापूर बोगस वैद्यकीय प्रयोगशाळा वर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाने समिती नियुक्त केली होती त्या समितीची नियमावली लवकरच जाहीर करणार आहे. अशी माहिती समितीतील सदस्याने दिली आहे .या वादात वैद्यकीय प्रयोगशाळांना परवाना मिळण्यासाठी कडक नियमांची चौकट ओलांडावी लागणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे आता राज्यात बोगस वैद्यकीय प्रयोगशाळांना लवकरच चाप बसणार असून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस लॅबचा गोरख धंदा आता बंद होणार आहे.
महाराष्ट्र पँरावैद्यकीय परिषद मध्ये समाविष्ट नसलेल्या मान्यताप्राप्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी पदवी, पदविका नसताना अनेक जण राज्यात पॅथॉलॉजी क्लिनिकल, लॅबरोटरी चे व्यवसाय करत शहर व ग्रामीण भागात अवास्तव शुल्क आकारून रुग्णास त्रासास सोमोरे जावे लागत होते. मान्यताप्राप्त विद्यापीठाची व बोर्डाची शैक्षणिक पात्रता नसताना व्यवसाय बिनधिक्कितपणे उघडून बसले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णाची संख्या पाहता अनेक लॅब चालकाने अमाप पैशाची लूट करून चुकीच्या निदानामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी मनस्ताप करावा लागला होता. कोव्हिड 19 च्या दरम्यान रुपये मिळवण्यासाठी राज्यभर वाढलेल्या बोगस लॅब वर जिल्ह्यावर सक्षमपणे नियंत्रण ठेवण्याची मागणी तसेच अनेक तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर व मागणी केल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी समिती स्थापन केली होती. राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीमध्ये आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र पॅरामेडिकल असोसिएशनचे अधिकारी आदी यांचा समावेश केला होता. समितीच्या सदस्याने सांगितले की या बैठकीत याद्वारे तयार केलेल्या वैद्यकीय अहवालावर कोणाची स्वाक्षरी आवश्यक आहे यावर देखील चर्चा झाला असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल. प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजी सोसायटीचे सचिव डॉक्टर रोहित जैन म्हणाले राज्यातील वैद्यकीय प्रयोगशाळांची संख्या अधिक आहे त्याच प्रमाणे अन्य राज्यातही हे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे मात्र यावर नियंत्रण समितीची नियुक्त करण्यासाठी राष्ट्रीय यंत्रणा आणि कायद्याची अधिक गरज असल्याचे त्यादृष्टीने काम लवकरच व्हायला व्हावे असे सांगितले.
"जुलै 2017 ला महाराष्ट्रत
पॅरावैद्यक परिषद कायदा लागू झाला आहे. त्यामुळे जर महाराष्ट्रत कुणाला पॅरावैद्यक व्यवसाय करण्यासाठी पॅरावैद्यक परिषदेची नोंदणी करणे बंधनकारक आहे. बोगस लॅबोरेटरी वर आळा बसण्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात यावी आणि होऊ घातलेल्या कायद्यात ही ती बंधनकारक राहील अशी मागणी पॅरा वैद्यक परिषदेनी केली आहे."
उमेश सोनार,अध्यक्ष,पॅरा वैद्यक परिषदमुंबई
Web Title: Clinical Laboratories Fraud State
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..