पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur Maruti Chittam Palli Bird Week

'सोलापूरचे पक्षी'  लघुपटाचे प्रकाशन 
सोलापूरच्या पक्षी जगताची माहिती देणाऱ्या 'सोलापूरचे पक्षी' या लघुपटाचे प्रकाशन करण्यात आले. दहा मिनिटाच्या लघुपटात सोलापूर शहरातील पक्ष्यांची माहिती आहे. रत्नाकर हिरेमठ यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप 

सोलापूर : मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनी (5 नोव्हेंबर) सुरू झालेल्या झालेल्या पक्षी सप्ताहानिमित्त शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचा आज समीर अली यांच्या जन्मदिनी समारोप करण्यात आला. 

5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या पक्षी सप्ताहानिमित्त सोलापूर महापालिका व जीआयबी कान्झर्वेशन फ्रंन्टच्यावतीने शहरात ठिकठिकाणी विविध पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. आज महपालिकेसमोरील उद्यानात या छायचित्र प्रदर्शनाचा समोरोप सोहळा झाला. या सोहळ्याचे उद्‌घाटन ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी.शिवशंकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, उपायुक्त धनराज पांडे, प्रदर्शनाचे संग्रहक पंकज चिंधरकर, राजकुमार कोळी आदी उपस्थित होते. 
सोलापूर शहरात 5 नोव्हेंबरपासून पंकज चिंदरकर व राजकुमार कोळी यांनी सकाळी 6 ते 9 या वेळेत शहरातील विविध ठिकाणी ज्या ठिकाणी सकाळी लोक फिरायला येतात अशा वॉकिंग ट्रॅकवर या प्रदर्शनाचे आयोजन केले. शंभरहून अधिक छायाचित्रांच्या या प्रदर्शनाचा 7 दिवसात सुमारे 14 हजार लोकांना आस्वाद घेता आला. 

सोलापुरातील पक्षीप्रेमी या सप्ताहानिमित्त आयोजित उपक्रमातर्गंत "घराचा एक कोपरा पक्ष्यांसाठी' तसेच "घोटभर पाणी मूठभर धान्य' कार्यक्रम वर्षभर राबवणार आहेत. यामध्ये काही ठिकाणी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बसवून त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या पक्षांच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत, तसेच काही ठिकाणी धान्य व पाणी ठेवून तिथे येणाऱ्या पक्षांच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. यां नोंदी पुढील वर्षाच्या पक्षी सप्ताह कार्यक्रमात जाहीर केल्या जाणार आहेत. यासाठी शिवानंद हिरेमठ, मुंकुद शेटे, अरविंद म्हेत्रे, मनीष देवकर, पंकज चिंधरकर व राजकुमार कोळी हे परिश्रम घेत आहेत. 

'सोलापूरचे पक्षी'  लघुपटाचे प्रकाशन 
सोलापूरच्या पक्षी जगताची माहिती देणाऱ्या 'सोलापूरचे पक्षी' या लघुपटाचे प्रकाशन करण्यात आले. दहा मिनिटाच्या लघुपटात सोलापूर शहरातील पक्ष्यांची माहिती आहे. रत्नाकर हिरेमठ यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

loading image
go to top