Solapur: नातेपुतेत कपड्याचे दुकान आगीत खाक; शॉर्टसर्किटमुळे लागली आग, साडेसात लाखांचे नुकसान
माजी आमदार राम सातपुते यांनी नातेपुतेची मोठी बाजारपेठ लक्षात घेऊन सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी अग्निशामक गाडीसाठी दिलेला होता. त्याच बंबाने पाच मिनिटांत आग आटोक्यात आणली.
Cloth shop destroyed in Natepute fire; estimated ₹7.5 lakh loss due to short circuit.Sakal
नातेपुते : शहरातील मार्केट कमिटीच्या मालकीच्या शंकरराव मोहिते पाटील शॉपिंग सेंटर मधील गाळा नंबर सी १० ला विज शॉर्टसकिट होऊन गुरुवारी (ता. ८) पहाटे आग लागली. या आगीत सुमारे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोणतीही जीवित हानी झालेली नाही.