Ashadhi Ekadashi : 'राज्यात भरपूर पाऊस पडू दे, शेतकरी सुखी-समाधानी राहू दे'; मुख्यमंत्री शिंदेंचे विठूरायाला साकडे

Ashadhi Ekadashi Pandharpur Mahapuja : यावेळी मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व त्यांच्या पत्नी आशा बाळू अहिरे या वारकरी दांपत्याला मिळाला.
Ashadhi Ekadashi Pandharpur Mahapuja
Ashadhi Ekadashi Pandharpur Mahapuja esakal
Updated on
Summary

आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

Summary

पंढरपूर : राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, माझा शेतकरी सुखी-समाधानी राहो दे, असं साकडं आपण विठ्ठल चरणी घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. आज आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

यावेळी मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व त्यांच्या पत्नी आशा बाळू अहिरे या वारकरी दांपत्याला मिळाला. आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

Ashadhi Ekadashi Pandharpur Mahapuja
Ashadhi Ekadashi Mahapuja : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न; यंदा नाशिकच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

मध्यरात्रीपासूनच चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आहे. दरम्यान, आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी त्यांनी राज्यात भरपूर पाऊस पडू दे, राज्यातील शेतकरी सुखी-समाधानी राहू दे असं आपण विठ्ठलाला साकडं घातल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यास अनेक आमदार खासदार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Amruta Fadnavis Fugdi Video
CM Devendra Fadnavis Performs Official Vitthal Mahapuja
Honourary Warkari Balasaheb Mane story
Devendra Fadnavis Vitthal Mahapuja in Pandharpur
Marathi News Esakal
www.esakal.com