
सोलापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, या दोन्ही योजना सध्या थांबल्या आहेत. सध्या नवीन लाभार्थींना अर्ज करता येत नाहीत आणि यापूर्वी अर्ज केलेल्या सर्व लाभार्थींना योजनांचा लाभदेखील मिळालेला नाही. राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार ध्यानात घेऊन काही योजना गुंडाळल्या जातील, असे विश्वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.