प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी एप्रिल पासून CMP प्रणाली लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CMP system implemented primary teacher salarie

प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी एप्रिल पासून CMP प्रणाली लागू

मंगळवेढा : दरमहा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास होणारा विलंब टाळण्यासाठी व वेतन प्रक्रियेतील टप्पे कमी कालावधीत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांचे वेतन CMP प्रणालीद्वारे नविन आर्थिक वर्षापासून एका क्लिकवर शिक्षकांचे वेतन होणार आहे.जिल्ह्यातील वेगवेगळ्या पंचायत समिती स्तरावर अनेकविध कारणांनी वेतनासाठी विलंब होत होता . या पार्श्वभूमीवर शिक्षकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यातून मार्ग काढण्यासाठी शिक्षक समितीने वारंवार जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करत या प्रश्नाचा तात्काळ निपटारा व्हावा यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना साकडे घातले .

शिक्षक समितीच्या रास्त भूमिकेला पाठबळ देत लोकप्रतिनिधींनी दिलेली सूचनापत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार,उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे,शिक्षणाधिकारीडॉ.किरण लोहार यांच्याकडे जिल्हाध्यक्ष अनिल कादे,जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे,दत्तात्रय पोतदार,विकास उकिरडे,शिक्षक नेते राजन सावंत,राजन ढवण,कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव,शिवानंद बिराजदार, संतोष हुमानाबादकर,जाफर मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सादर करीत यासाठी आग्रही भूमिका घेतली होती.जिल्हा परिषद आस्थापने अंतर्गत विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन वन क्लिकवर अदा होते .

मात्र जिल्ह्यातील मोठी आस्थापना असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाची तरतूद अर्थ विभागातून गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. स्थानिक पंचायत समिती स्तरावरील अनेकविध अडचणीमुळे जिल्ह्यातील शिक्षक बांधवांच्या वेतनास नेहमीच विलंब होतो.वेतन विलंबामुळे प्राथमिक शिक्षकांना बँकेचे,पतसंस्थेचे तसेच इतर कर्जाचे हफ्ते वेळेवर भरता न आल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.ही बाब गेल्या दीड वर्षात सातत्याने शिक्षक समितीने निदर्शनास आणून देऊन वेतनप्रक्रियेतील टप्पे कमी करण्यासाठी जिल्हास्तरावरून थेट शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा करण्यासाठी CMP प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील होती.

त्याअनुषंगाने एप्रिलचे वेतन CMP प्रणालीद्वारे होणार असून त्यासंदर्भातील प्रशासन पातळीवरील सर्व प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास आलेल्या आहेत. गुरुवार दि. 8 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधि कारी यांची यासंबंधी फाॕर्म भरणे व विहीत नमुन्यातील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अर्थ विभागाने बैठक बोलाविण्यात आली

शिक्षकांचे एप्रिलचे वेतन CMP प्रणालीद्वारे

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतनास होणारा विलंब टाळण्यासाठी CMP प्रणाली राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली CMP प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात असून एप्रिलचे वेतन CMP प्रणालीद्वारे करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे .

उत्तमराव सुर्वे,उपमुख्य मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.सोलापूर

शिक्षक समितीच्या पाठपुराव्याला यश

प्राथमिक शिक्षकांची आस्थापना ही जिल्ह्यात सर्वात मोठी असून वेतन विलंबाने होत असल्याने शिक्षकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड होत होता.वेतनातील टप्पे कमी करण्यासाठी CMP लागू करण्याची संघटनेची आग्रही मागणी होती.त्यानुसार एप्रिलचे वेतन CMP प्रणालीद्वारे होणार आहे .

सुरेश पवार , जिल्हानेते शिक्षक समिती,सोलापूर

Web Title: Cmp System Implemented Primary Teacher Salarie New Financial Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..