
Solapur Coffee With Sakal: जनसंवाद आभार दौऱ्याच्या माध्यमातून गावागावात जाऊन जनतेच्या सूचना, अपेक्षा जाणून घेत आहे. येत्या पाच वर्षात दक्षिण सोलापूर तालुक्याचे दूध संकलन पाच लाख लिटरवर नेण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी ९८ दूध संकलकांची बैठक घेतली आहे.
२०१४ मध्ये १५ ते २० हजार लिटर दूध संकलन होते. ते आता ८० हजार लिटरवर गेले आहे. १०० दिवसांनंतर त्यावर आधारित विकासकामांचे नियोजन करण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षांत मतदारसंघात पायाभूत सुविधांसह शिक्षण, शेतीपूरक उद्योग, सिंचन, पर्यटन विकासावर भर देणार असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले. ‘कॉफी विथ सकाळ’ मध्ये ते बोलत होते.