Pandharpur News : भक्त पुंडलिकाच्या रुपात जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची सेवा; ऐंशी वर्षांच्या आजीला थेट देवाचे दर्शन

सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि माणूसकीचे दर्शन याची आज दिवसभर चर्चा होती.
old woman padmaja warase

old woman padmaja warase

sakal

Updated on

पंढरपूर - सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि माणूसकीचे दर्शन याची आज दिवसभर चर्चा होती. त्यांच्या याच संवेदनशीलतेमुळे तब्बल आठ तास दर्शन रांगेत थांबलेल्या आमरावती जिल्ह्यातील एका वृध्द ऐंशी वर्षांच्या आजीला थेट देवाचे दर्शन घडवले. दर्शनानंतर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन हे माझ्यासाठी भक्त पुंडलिकाच्या रूपात धावून आल्याची भावना त्या आजीने व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com