esakal | सोलापुरातील महिलांना लॉकडाऊनमध्ये दिलासा

बोलून बातमी शोधा

Comfort for women in lockdown in Solapur

लॉकडाउनच्या काळात सॅनिटरी नॅपकिन घेण्याचे प्रमाण घटल्याचे निदर्शनास आले. पैशाअभावी काही भागातील महिला व मुली सॅनिटरी नॅपकिन घेत नसल्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातून आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. म्हणून या महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी संस्थेच्या वतीने सॅनिटरी नॅपकिनचे ऑउटलेट बॉक्‍स ठेवण्यात आले आहेत.

सोलापुरातील महिलांना लॉकडाऊनमध्ये दिलासा
sakal_logo
By
प्रशांत देशपांडे

सोलापूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन सुरू आहे. सरकार नागरिकांना घरीच बसा, असे आवाहन करत आहे. मात्र यामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. यादरम्यान बऱ्याच महिला पोटापाण्याचा प्रश्‍न सोडविताना आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यातून मुली व महिलांच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. यावर तोडगा म्हणून संकल्प युथ फाउंडेशनच्या वतीने "सहेली एक पाऊल सन्मानाकडे' हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत सॅनिटरी नॅपकिनचे शहरात आउटलेट बॉक्‍स ठेवण्यात आले आहेत. 

हेही वाचा : अन 20 मिनीटांत सोलापूर जिल्ह्यात झाले होत्याचे नव्हते ! 

याबाबत फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे म्हणाले, काही दिवसांत शहरातील मेडिकलमध्ये सॅनिटरी नॅपकिन किती घेतल्या जातात. याविषयी सर्व्हे केला. यामधून लॉकडाउनच्या काळात सॅनिटरी नॅपकिन घेण्याचे प्रमाण घटल्याचे निदर्शनास आले. पैशाअभावी काही भागातील महिला व मुली सॅनिटरी नॅपकिन घेत नसल्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातून आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. म्हणून या महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी संस्थेच्या वतीने सॅनिटरी नॅपकिनचे ऑउटलेट बॉक्‍स ठेवण्यात आले आहेत. या बॉक्‍समधील नॅपकिन स्लम एरियामधील महिला व मुलींसाठी मोफत मिळणार आहेत. एका आउटलेट बॉक्‍समध्ये 150 ते 200 सॅनिटरी नॅपकिन ठेवल्या आहेत. हे आउटलेट बॉक्‍स शहरात मोदी विभागात दोन ठिकाणी किराणा दुकानात ठेवले आहेत. याची जबाबदारी या दुकानातील महिलांकडे देण्यात आली आहे. दुकानात येणाऱ्या महिला व मुलींना हे सॅनिटरी नॅपकिन मोफत देण्यास सांगितले आहे. संकल्प युथ फाउंडेशनने या वस्तीत दोन ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनचे आउटलेट बॉक्‍स त्याच दुकानी बसवले आणि त्यांना त्या ठिकाणी मोफत आणि पाहिजे त्या वेळेस उपलब्ध करून दिले. 

हेही वाचा : खासदार डॉ. महास्वामींनी काय सांगितले 

मासिक पाळीविषयी जनजागृती 
मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जनजागृती होण्यासाठी तसेच मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी कशाप्रकारे घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेच्या वतीने "थॅंक्‍यू बाबा' ही एकांकिका शहरातील 10 शाळांमध्ये सादर केली होती. 


ब्रॅंडेड सॅनिटरी नॅपकिन 
गुजरातमधून मागवले सॅनिटरी नॅपकिन संकल्प फाउंडेशनने महिला व मुलींची अडचण दूर करण्यासाठी गुजरातमधून सॅनिटरी नॅपकिन मागविले आहेत. गुजरातमधील ही कंपनी सॅनिटरी नॅपकिन एक रुपयाला विकते. येथे मिळणारे नॅपकिन स्वस्त आणि ब्रॅंडेड असल्यामुळे येथून हे सॅनिटरी नॅपकिन मागवण्यात आले. 
- किरण लोंढे